कोळकीत पाणीटंचाई : ग्रामपंचायतीकडून पाणीवाटपाचे फेरनियोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
जस जसा उन्हाळा वाढत आहे, तस तशी फलटण तालुक्यात पाणीटंचाईची भीषणता अधिकच जाणवायला लागली आहे. फलटण शहराचे उपनगर असलेल्या कोळकी भागामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी वाटपाचे फेरनियोजन केले आहे.

ग्रामपंचायतीने केलेले पाणी वाटपाचे फेरनियोजन पुढीलप्रमाणे :

  1. मालोजीनगर वरचा भाग – पाणी सोडलेला वार शुक्रवार, परत पाणी सोडण्याचा वार – मंगळवार, पाणी कर्मचारी – किशोर सातव (९५५६६९६९१४).
  2. मालोजीनगर खालचा भाग – पाणी सोडलेला वार शनिवार, परत पाणी सोडण्याचा वार – बुधवार, पाणी कर्मचारी – किशोर सातव (९५५६६९६९१४).
  3. वनदेवशेरी १ – पाणी सोडलेला वार शुक्रवार, परत पाणी सोडण्याचा वार – मंगळवार, पाणी कर्मचारी – अक्षय नाळे (९७०२५५९२७५).
  4. वनदेवशेरी २ – पाणी सोडलेला वार शनिवार, परत पाणी सोडण्याचा वार – बुधवार, पाणी कर्मचारी – अक्षय नाळे (९७०२५५९२७५).
  5. शारदानगर, अक्षतानगर, महादेवनगर प्रत्येकी भाग १ – पाणी सोडलेला वार शुक्रवार, परत पाणी सोडण्याचा वार – मंगळवार, पाणी कर्मचारी – प्रसाद म्हेत्रे (८२०८००६०२५).
  6. शारदानगर, अक्षतानगर, महादेवनगर प्रत्येकी भाग २ – पाणी सोडलेला वार शनिवार, परत पाणी सोडण्याचा वार – बुधवार, पाणी कर्मचारी – प्रसाद म्हेत्रे (८२०८००६०२५).
  7. जगतापवस्ती, शिंदे मळा, व्हीएनएस – पाणी सोडलेला वार शुक्रवार, परत पाणी सोडण्याचा वार – मंगळवार, पाणी कर्मचारी – लक्ष्मण पखाले (८८५६९१३१४७).
  8. अबदागिरे वस्ती, पुनर्वसन – पाणी सोडलेला वार शनिवार, परत पाणी सोडण्याचा वार – बुधवार, पाणी कर्मचारी – लक्ष्मण पखाले (८८५६९१३१४७).
  9. अजितनगर, हॉटेल लाईन राधिका गार्डन सावतामाळीनगर, घोलप लाईन, पत्र्याचा मळा – पाणी सोडलेला वार शुक्रवार, परत पाणी सोडण्याचा वार – मंगळवार, पाणी कर्मचारी – गणेश वाडेकर (८६००४२९१२३).
  10. नरसोबानगर, काशिद लाईन, दळवी लाईन – पाणी सोडलेला वार शनिवार, परत पाणी सोडण्याचा वार – बुधवार, पाणी कर्मचारी – गणेश वाडेकर (८६००४२९१२३).

वरीलप्रमाणे नीरा उजवा कालवा बंद झाल्यापासून पाणी वाटप होईल. रविवार, सोमवार, शुक्रवार या दिवशी पूर्ण पंपिंग बंद राहील.

पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून आपल्यासह जनावरे, पशूपक्षी यांनाही पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन कोळकी ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!