दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । सातारा । दहिवडी फलटण मार्गावर असलेल्या बालाजी पेट्रोल पंपावर बुधवारी दिनांक आठ रोजी रात्री दहा वाजता अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून एकवीस हजाराची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे दहिवडी परिसरात एकच खळबळ उडाली असून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
दरम्यान या चोरट्यांची छायाचित्रे सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू आहे याबाबत मिळालेली माहिती अशी दहिवडी फलटण रस्त्यावर तिकाटणे नावाच्या परिसरात बालाजी पेट्रोल पंप आहे बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास पेट्रोल विक्रीचे काम सुरू असताना यामाहा एफ झेड या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने एका कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडे 21 हजार रुपये लांबवले
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून औषधांचा तपास सुरू झाला आहे पोलिसांची पथके त्या त्या दिशेने रवाना झाली असून तपासाने वेग घेतला आहे