दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार ३० मे २०२२ रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे २०१४ ते २०१९ या पाच वर्षाचा कालावधी घेऊन मोदी सरकारचा कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर सुशासन सेवा, गरीब कल्याण पर्व पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे.अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आ जयकुमार गोरे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सुचने नुसार सातारा जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मंडलात दि ३१ मे रोजी गरीब कल्याण जनसभा या नावाने व्हर्च्युअल सभेचे आयोजन करण्यात येणार आहे या वेळी मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते शेतकर्यांसाठीच्या अनुदानाचे वितरण आणि मार्गदर्शन होणार आहे .त्याचे थेट प्रक्षेपण सर्वांसाठी करण्यात येणार आहे , सर्वांनी ते पहावे असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
मोदी सरकारच्या कामाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी निवडक क्षेत्रातील लाभार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायिक यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्यांना मोदी सरकारच्या कामाचे पुस्तक आणि स्मृती चिन्ह दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक सर्व प्रादेशिक भाषांमध्ये तयार केले जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन मोदी सरकारच्या कामाची माहिती दिली जाणार आहे, तसेच पक्षाचे सर्व आमदार, खासदार, प्रदेश, जिल्हा,मंडल पदाधिकारी हे आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन जनसंपर्काची व्यापक मोहीम पूर्ण करतील. या मोहिमेमध्ये मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी संवाद, पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, प्रभातफेर्यांचे आयोजन, प्रभावशाली व्यक्तींबरोबर स्नेहभोजन, विविध समाजघटकांची म्हणजे शेतकरी, महिला, वंचित घटक, अनुसूचित जाती, जमाती, शहरी भागातील गरीब, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती, लसीकरण कार्यक्रमात सहभागी असलेल्या आरोग्य स्वयंसेवकांचा सन्मान कार्यक्रम, देशासाठी हुतात्मा झालेल्यांचे कुटुंब दत्तक घेणे यासारख्या कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे.अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
युवा मोर्चा तर्फे सातारा जिल्ह्यात विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. याचवेळी मोदी सरकार आणि एनडीए सरकार द्वारे सुरु करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना भेटी देण्यात येतील. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब विश्वास रॅली काढण्यात येणार आहे . तसेच अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी केलेल्या विविध निर्णयाची माहिती देण्यात येणार आहे . आदिवासी बंधू भगिनींच्या मेळाव्याचे आयोजन करून आदिवासींसाठी राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात येईल. अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने संपर्क अभियान आयोजित करून मोदी सरकारने अल्पसंख्यांकासाठी घेतलेल्या विविध योजनांची निर्णयांची माहिती समाजापर्यंत पोहोचली जाणार आहे , मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजना वर आधारित अभियान गीत तयार करून प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा ते रूपांतरित केले जाईल ,मोदी सरकारच्या योजनांचा लाभार्थी विषयीच्या बातम्या, चित्रफिती जनकल्याण कार्यक्रम प्रसिद्ध केले जातील, वेगवेळ्या वर्तमानपत्रातून, व्हिडिओ न्यूज चॅनल मधून, विविध रेडिओ चॅनल वरून मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या बातम्या चित्रफिती जिंगल्स प्रसारित करण्यात येणार आहेत.
पंतप्रधनांनी गरिबांसाठी केलेल्या लोक कल्याणाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पंधरा दिवसांचा कार्यक्रम होत असून, तसेच भाजपा लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाची माहिती सुद्धा जनसामान्यांपर्यंत पोचवण्यात येणार आहे ,नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले पत्र घरोघरी पोहोचवण्याचे कामसुद्धा यानिमित्त करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे सर्व मंडल अध्यक्ष ,सर्व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काम करतील अशी खात्री या वेळी आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.