कृष्णानगर परिसरातील गळत्या काढण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचा खुलासा


स्थैर्य, 23 जानेवारी, सातारा : कृष्णानगर परिसरात झालेल्या गळत्या, गळती काढणे, जलवाहीन्या स्थलांतर करणे ही सर्वस्वी एमएसआरडीसी व त्यांचे ठेकेदार यांची जबाबदारी आहे. याबाबत आवश्यक तो सर्व पत्रव्यवहार, पाठपुरावा, गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामार्फत करणेत आल्या आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी खुलाशाद्वारे दिली आहे.

सातारा शहरातील दैनंदिन पाणी पुरवठ्याचे व दैनंदिन देखभाल दुरुस्तीचे काम या कार्यालयामार्फत करणेत येत आहे. सातारा-कोरेगांव राज्य मार्ग क्र. 141 व 145 चे रूंदीकरणोच काम एमएसआरडीसी यांचेमार्फत करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना संबंधीत विभागाच्या ठेकेदारामार्फत बॉम्बे रेस्टॉरंट चौक कृष्णानगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवर गळती झाली झाल्याबाबतचे वृत्त काही वृत्तपत्रातून प्रसिध्द झाले होते. या सदर्भांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांनी खुलाशाद्वारे पुढील माहिती दिली आहे. जलजीवन मिशन व देखभाल दुरूस्ती हे स्वतंत्र विषय असून जलजीवन मिशन हा केंद्र शासनाचा कार्यक्रम असून सदर अंतर्गत योजना पूर्ण झाले नंतर त्याची देखभाल दुरूस्ती संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाची आहे व सातारा देखभाल देखभाल दुरूस्ती हा स्वतंत्र विषय आहे.

सातारा शहरामध्ये तसेच शहर उपनगर भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अंदाजे 200 किमी इतक्या लांबीच्या जलवाहिन्या रस्त्याच्या बाजूने अंथरण्यात आलेल्या आहेत. त्यातूनच शहराचा दैनंदिन पाणी पुरवठ्याचे वितरण करणेत येत आहे. शासनाच्या विविध विभागांतर्गत विकासकामे सद्यस्थितीत सातारा शहरात प्रगतीपथावर आहेत. (रिलाईन्सची कामे, रोड, गॅस पाईप, रस्ता रुंदीकरण, गटारे इ.) सदरची विकासकामे करित असताना मजीप्राच्या जलवाहीन्यांची तोडफोड होवू नये तसेच आवश्यकतेनुसार जलवाहीन्यांचे स्थलांतर करणे, तूटफूट झाल्यास, गळती झाल्यास गळती त्वरीत काढून घेणे इ.ची जबाबदारी संबंधीत यंत्रणेची व त्यांचे ठेकेदाराची आहे. कृष्णानगर येथील सातारा-कोरेगांव रस्ता येथे झालेली गळती ही एमएसआरडीसी चे रस्ता रुंदीकरणाचे काम करित असताना एमएसआरडीसी चे ठेकेदार मेघा इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रा लि. यांचेकडून झालेले आहे. सातारा-कोरेगांव म्हसवड अकलूज टेंभूर्णी राज्यमार्ग क्र.141 व 145 च्या रूंदीकरणामध्ये येणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे योजनांची उपांगे, जलवाहीन्या स्थलांतरीत करणे याचे सविस्तर अंदाजपत्रक एमएसआरडीसी यांचे कार्यालयाने मागणी केलेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करून त्यास तांत्रिक मान्यता घेवून एमएसआरडीसी विभागास पुढील कार्यवाहीकरिता सादर करणेत आले आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ट-झ साठी देखील मान्यता देणेत आली होती. त्यानुसार संबंधीत विभाग व ठेकेदार यांनी रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू करणेपूर्वी मजीप्राच्या जलवाहीन्या, योजनांची उपांगे यांचे स्थलांतरण करणे आवश्यक व बंधनकारक होते. परंतु संबंधीतांकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करणेत आलेली नाही. सदरची बाब अत्यंत संवेदनशील असल्याने याबाबत वेळोवेळी संबधीत यंत्रणेस पत्रव्यवहार करणेत आला असून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांना सादर केली आहे.

संबंधीत यंत्रणेकडून या यंत्रणेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास अवगत न करता जलवाहिनी स्थलांतर न करता रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेणेत आल्याने यापूर्वी वारंवार जलवाहिन्यांच्या गळत्या आलेल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या भारत पेट्रोलियम पंपासमोर दि.6 फेब्रुवारी 2023, वैद्यकीय महाविद्यालय गेट समोर 6 जानेवारी 2024, कच्छी स्टिल समोर दि.17 मे 2024, पुजारी फर्निचरसमोर दि.28 ऑक्टोबर 2024, मिनाक्षी हॉस्पिटलसमोर दि.10 डिसेंबर 2025 या सर्व गळत्या 600 मीमी व्यासाच्या मुख्य जलदाबनलिकेवरील काढणेत आलेल्या आहेत. तसेच संगमनगर भागात जाणान्या 200 मीमी व्यासाच्या वितरण नलिकेवर ते 12 ठिकाणी गळत्या काढणेत आलेल्या आहेत. या शिवाय वृत्तपत्रामध्ये नमूद केलेली कृष्णानगर येथील 250 मीमी व्यासाच्या वितरण नलिकेवरील गळती काढणेत आलेली आहे व बॉम्बे रेस्टॉरंट येथील सुचत्री हॉटेल समोर 150 मीमी व्यासाच्या दाबनलिकेवर सद्यस्थितीत झालेली गळती काढण्यात येत आहे. या शिवाय ग्राहकांच्या नळकनेक्शनची तूटफूट मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सदरच्या सर्व गळत्या मजीप्राने स्वखर्चातून वेळोवेळी त्वरीत काढून दैनंदिन पाणी पुरवठा सुस्थितीत केला आहे. तसेच चारंवार होणार्‍या गळत्या, चडठऊउ चे ठेकेदार तसेच संबंधीत चडठऊउ चे प्रतिनीधी यांचे देखील वेळोवेळी निदर्शनास आणून देणेत आलेल्या आहेत. या सर्व गळत्या काढणेसाठी आज अखेर सुमारे रक्कम रू. 1.5 कोटी इतका खर्च करणेत आलेला आहे. पाईपलाईन स्थलांतरण करणेची कामे एमएसआरडीसी विभागाने मंजूरी देवून सुध्दा वेळेत न केल्याने सदर गळतीचा खर्च या विभागाच्या देखभाल दुरूस्ती अंतर्गत करणेत आलेने प्राधिकरणास आर्थिक झळ पोहचालेने वरिष्ठ कार्यालयास खुलासा द्यावा लागत आहे.

तरी देखील संबंधीत ठेकेदाराच्या कार्यपध्दतीत सुधारणा न झाल्याने व होणार्‍या गळतीचे देखभाल-दुरुस्तीचा खर्च जास्तीचा असल्याने मजीप्रामार्फत ठेकेदारावर गुन्हा देखील दाखल केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहीन्या स्थलांतर करणे व गळती दुरूस्ती करणे याबाबत एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता यांनी देखील ठेकेदारास वारंवार पत्राद्वारे कळविले होते. तसेच सदर ठेकेदाराने काम सुरू करीत असल्याबाबत पत्राद्वारे कळविले होते. परंतु तरी देखील ठेकेदार यांनी जलवाहीन्या स्थलांतरणाचे काम हात्ती घेतले नाही. कृष्णानगर भागामध्ये सुमारे 30-40 वर्षापूर्वी टाकणेत आलेल्या -उ/झतउ/चड दाबनलिका, वितरणनलिका असून रस्त्याच्या कामाध्ये त्यांना हानी पोहचलेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या गळत्या काढल्या तरीही बारंबार पुनश्च गळत्या होतच राहाणार आहेत. त्यामुळे पाईपलाईन स्थलांतरीत करणे हाच त्यावर कायमस्वरूपी उपाय आहे.


Back to top button
Don`t copy text!