दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । फलटण । सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षण सुरु केल्याने आताच्या काळामध्ये मुली विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आताच्या काळामध्ये मुली ह्या कृषी क्षेत्रात सुद्धा काम करताना दिसत आहेत. आताच्या आलेल्या कृषी कन्या कृषी मध्ये खूप काही शिकून आणि समाजाला शिकवून जातील, असे मत जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथे कृषी कन्या कु. आकांक्षा हाके, कु. वैष्णवी गायकवाड, कु. ऋतुजा जाधव, कु. प्रगती गोसावी, कु. अश्विनी घोडके, कु. एकता गावडे व कु. श्रद्धा डांगे यांनी सोयाबीन लागवड, ऊस लागवड, कपाशी लागवड, हुमणी किड नियंत्रण, माती परीक्षण यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी जेष्ठ नेते सुभाष शिंदे बोलत होते. शिंदेवाडीच्या सरपंच निर्मला अरूण शिंदे, आनंदराव यादव, प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे, दादासाहेब यादव, रघुनाथ यादव, सचिन भगत, संदीप यादव, अजित यादव, राजेंद्र निगडे, सागर यादव, सचिन भगत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
आता येणाऱ्या काळामध्ये ऊस शेतीच्या ऐवजी सोयाबीन, कपाशी किंवा तत्सम लागवड करून जमीनीचा पोत सुधारला पाहिजे. यासोबतच रासायनीक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खत वापरली पाहिजेत. तर आणि तरच पुढच्या पिढीला निरोगी जमीन आपण देऊ शकतो असे म्हणत कृषी विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रास्ताविक व आभार कु. श्रद्धा डांगे हिने मानले.