दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । सातारा । आगामी पावसाळा डोळ्यासमोर ठेवून जलसिंचन विभागाने कास धरणाच्या उंचीचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आणून ठेवले आहे . धरणाच्या नव्या सांडव्याची दगडी पिचिंग चे काम सुरू असून या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच केली हे काम दर्जेदार आणि अत्यंत मजबूत झाले पाहिजे अशा सूचना उदयनराजे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
कास धरणाची उंची वाढवल्यानंतर या धरणाचा पाणीसाठा जवळपास एक टीएमसी च्या आसपास होणार आहे सातारा शहरासह कास मार्गावरील एकूण 22 गावांना या धरणाच्या पाण्याचा लाभ होतो जलसिंचन विभागाने साधारण शंभर कोटी रुपये खर्च करून खास धरणाच्या दगडी सांडव्याचे काम पूर्णत्वास आणले आहे या धरणाच्या नवीन भिंतीला दगडी पिचिंग करण्यात येत असून येत्या पावसाळ्यात नव्या सांडव्यावरून पहिल्यांदाच पाणी वाहणार आहे.
या धरणाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली यावेळी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे,मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपाध्यक्ष मनोज शेंडे, प्रकल्प तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते उदयनराजे यांनी भिंत सांडवा व त्या परिसरातील इतर कामांची पाहणी करत पावसाळ्यापूर्वी बामणोली खोऱ्याला जोडणारे रस्ते तसेच इतर सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या काम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी इतर तांत्रिक काम युद्धपातळीवर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले धरणाच्या भिंतीची उंची वाढल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात मधील पाणीसाठ्यात वाढ होणार असून किमान 60 टक्के पाणी अडवले जाईल असा अंदाज आहे या पुढील काळात पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.