दैनिक स्थैर्य । दि. ०४ जून २०२२ । सातारा । सातारा तालुका महसूल विभागाच्या कारवाई निवडलेल्या कास पठारावरील सुमारे दहा गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली बडे हॉटेलवाले आणि छोटेसे बांधकाम करून किरकोळ व्यवसाय करणारे विक्रेते यांच्यातील फरक ओळखून महसूल विभागाने कारवाई करावी आणि आमची बांधकामे नियमित करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी करण्यात आली आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक व परळी भागातील युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली कास परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली.
त्यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, कास पठारावरील वेगवेगळ्या पंधरा ते सोळा गावांमध्ये गेल्या काही पिढ्या आमच्या येथे शेती व्यवसाय करत आहेत. डोंगर उतारावरील शेती आणि वन्य श्वापदांचा वावर यामुळे वेळोवेळी जीव धोक्यात घालून आम्हाला राहावे लागत आहे कास तलाव आणि परिसर आणि पठाराला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर येथील पर्यटन वाढले आणि महाराष्ट्रातील लाखो पर्यटकांचा राबता कास पठाराकडे सुरू झाला त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आपल्या जमीन मध्ये थोडीशी बांधकामे करून तेथे छोटे-मोठे टपरीवजा हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत मात्र सातारा महसूल विभागाने आमच्या घरांना सील करून तेथे कुलपे घालून आमच्या व्यवसायाचे अडचण केलीआहे त्यामुळे आमच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिथे नक्की अतिक्रमणे झाली आणि पर्यावरणाला धोका उत्पन्न करण्यात आला आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या बांधकामांना आमचा विरोध नाही तेथे जरूर कारवाई करावी मात्र कारवाईच्या नावाखाली जर स्थानिक भूमिपुत्रांना महसूल विभाग प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहेत येथील भूमिपुत्रांची बांधकामे नियमित करावीत आणि महसूल विभागाच्या कारवाया होताना त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात त्याचा स्थानिकांना त्रास होऊ नये अशा मागण्या जिल्हाधिकारी शेखर सेन यांना करण्यात आल्या शेखर सिन्हा यांनी या संदर्भात तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे संबंधित ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे.