कामगार दिनानिमित्त शनिवारी फलटणमध्ये कष्टकर्‍यांचा सन्मान


दैनिक स्थैर्य | दि. १० जानेवारी २०२५ | फलटण |
कामगार दिनानिमित्त अनुबंध कला मंडळ, फलटण यांच्याकडून फलटण परिसरात अनेक वर्षे अखंडित सेवा देणार्‍या विविध क्षेत्रातील कामगारांचा सन्मान करण्यात येणार आहे. शनिवार, दि. ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. प्रसाद जोशी हॉस्पिटल सभागृह, ४ था मजला, लक्ष्मीनगर, फलटण येथे हा कार्यक्रम होणार आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा सन्मान होणार असून डॉ. श्रीकांत करवा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या सोहळ्यात फलटण येथील श्रीमती राधाबाई मोरे, संजय शिरतोडे, हनुमंत बिचुकले, अशोक करगे, मुस्तफा खान, श्रीमती शालन मिरेकर, श्रीमती शोभा गोरे, सौ. कमल नरुटे, बंडु अहिवळे, निसाल साह यांचा सन्मान होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!