
स्थैर्य, सातारा, दि. 26 नोव्हेंबर : टोकियो येथे सुरू असलेल्या 25व्या कर्णबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत सातार्यातील प्रांजली प्रशांत धुमाळ हिने महिलांच्या 25 मीटर स्पोर्टस् पिस्तूल प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. तिचे हे वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक आणि स्पर्धेतील तिसरे पदक ठरले आहे.
भारताच्या प्रांजलीने अंऑतिम फेरीत 34 गुण प्राप्त करून सुवर्णपदकाची कामगिरी फत्ते केली. युक्रेनच्या हॅलिना मोसिनाने 32 गुणांसह रौप्यपदक, तर जिवोन जिओनने 30 गुणांररह कांस्यपदक मिळविले. प्रांजलीने
यापूर्वी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात अभिनव देशवालसह सुवर्णपदक जिंकले होते. पात्रता फेरीत प्रांजलीची कामगिरी सरस ठरली. तिने जागतिक कर्णबधिर पात्रता विक्रम आणि कर्णबधिर ऑलिंपिक स्पर्धेतील विक्रमही मोडला. तिने 573- 14 गुणांचा शूटिंग केला आणि गेल्या वर्षी हॅनोव्हर येथे झालेल्या जागतिक कर्णबधिर नेमबाजी स्पर्धेत तिचा स्वतःचा विश्वविक्रम मोडला. या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी 16 पदके जिंकली आहेत. यामध्ये सात सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.

