करोनाच्या लाटेसाठी जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा सज्ज; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । सातारा । कॊरोनाचे बीए 4, बीए 5 हे दोन नवे विषाणू रुग्ण मुंबई, ठाणे व आता पुण्यात आढळून आल्याने जिल्हयातील आरोग्य यंत्रणाही अलर्ट झाली आहे. नव्या विषाणूचा कम्युनिटी स्प्रेडिंग कमी असल्याने धोका कमी असल्याचे तज्ज्ञाकडून सांगण्यात आले आहे. सध्या जिल्हयात करोना रुग्ण निहित जरी आढळले तरी त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

ओमायक्रॉन’च्या विषाणूचे बीए 4, बीए 5 हे दोन नवे विषाणू आढळले असले, सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील पुळकोटी येथे करोनाचा रुग्ण आढळून आला आहे. पुण्यासह महाराष्ट्रात पूर्वीच्या विषाणूंचा संसर्ग, लसीकरणामुळे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या विषाणू प्रकाराच्या संसर्गापासून दक्ष राहावे लागणार आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेत ’कप्पा’, ’डेल्टा’सारखे नवे विषाणू प्रकार आढळले होते. पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून पुण्यात मे महिन्यात आढळलेल्या रुग्णांचे बीजे मेडिकलच्या माध्यमातून ’आयसर’च्या प्रयोगशाळेने जिनोम सिक्वेन्सिंग केले.
ओमायक्रॉन’च्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर अद्याप जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना आल्या नसल्या तरी आरोग्य यंत्रणा मात्र, सज्ज झाली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेप्रमाणे आढळलेल्या रुग्णामध्ये लक्षणे दिसत आहेत. ऑक्सिजनची पातळी कमी होत नाही हि बाब दिलासादायक आहे. शासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन समिती बैठक घेतली जाईल. मात्र, खबरदारी म्हणून कोविड काळात सुरु असलेले जिल्हा रुग्णालयात 52 बेड्चे दोन आयसीयू तयार आहेत. रुग्णालयातील 100 हुन बेड कोविडसाठी रिक्त ठेवले आहेत. नागरिकांनी जरी जिल्हयात कोविडचा एकही रुग्ण नसला तरी फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्क वापरणे गरजचे असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

समूहसंसर्ग नसला, तरी दक्ष राहायला हवे…
ओमायक्रॉनचा नव्या प्रकाराचा विषाणू गेल्या महिनाभरापासून पुण्यात असल्याने ’कम्युनिटी स्प्रेडिंग’ व्हायला हवे होते. मात्र, त्याचा वेग पाहता अद्याप त्याचा समूहसंसर्ग झाला नाही. त्यामुळे फारसे रुग्ण आढळले नाहीत. मात्र, या विषाणूमुळे बाधित झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते का; तसेच त्यांना अतिदक्षता विभाग किंवा ऑक्सिजनची गरज आहे का, याचे निरीक्षण करावे लागणार आहे. ’पॅनिक’ होऊ नका, असाही सल्ला डॉ सुभाष चव्हाण यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!