दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । मुंबई । ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज त्यांच्या ग्राहकांसाठी विभागातील प्रथम उपक्रमाची घोषणा केली. देशातील पंधरा गौरवशाली वर्षांना साजरे करण्यासाठी ऑडी इंडियाने यंदा विकण्यात आलेल्या त्यांच्या सर्व कार्ससाठी १ जून २०२२ पासून अमर्यादित मायलेजसह पाच वर्षांसाठी वॉरंटी कव्हरेज सादर केले आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “भारतातील पंधरा गौरवशाली वर्षे साजरी करण्यासाठी आम्ही यंदा आमच्या ग्राहकांसाठी १ जून २०२२ पासून अमर्यादित मायलेजसह पाच वर्षांसाठी विभागातील प्रथम वॉरंटी कव्हरेजची घोषणा केली आहे. हा उपलब्धी प्राप्त उपक्रम आहे आणि आम्हाला परिपूर्ण मन:शांती देणारे पॅकेज सादर करण्याचा आनंद होत आहे. हा उपक्रम ऑडी इंडियाच्या ‘स्ट्रॅटेजी २०२५’शी संलग्न आहे, जो ह्युमन सेंट्रिसिटीवर लक्ष केंद्रित करतो आणि आम्हाला प्रत्येकवेळी ग्राहकांना प्राधान्य देण्यास प्रेरित करतो.”
ऑडी इंडियाचा त्यांच्या वाहनांमधील सातत्यपूर्ण आत्मविश्वास ग्राहकांसाठी प्रदान करण्यात आलेल्या व्यापक वॉरंटी पॅकेजमधून दिसून येतो. पाच वर्षांसाठी वॉरंटी कव्हरेज अमर्यादित मायलेजसाठी वैध आहे आणि त्यामध्ये कोणतेही रिपेअर किंवा कम्पोनण्ट फेलर्सच्या रिप्लेसमेंटचा समावेश आहे.