दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । मुंबई । एमजी मोटर आज एमजीव्हर्स या मेटाव्हर्स प्लॅटफॉर्मची त्यांच्या दृष्टीकोनाची घोषणा करणारी भारतातील पहिली ऑटो ओईएम आणि उद्योगांमधील काही मोजक्याच ब्रॅण्ड्सपैकी एक बनली. कंपनी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून ग्राहक व भागधारकांना सर्वोत्तम अनुभव देईल.
एमजीव्हर्स हे युनिव्हर्स म्हणून कार्य करेल, ज्यामध्ये एकाच व्यासपीठावर अनेक व्हर्च्युअल क्षेत्रांचा समावेश असेल. यासह ब्रॅण्डचा एमजी चाहते, ग्राहक, भागीदार व कर्मचा-यांना काम करण्यासाठी, खेळण्यासाठी, सामावून घेण्यासाठी, सहयोग करण्यासाठी, सह-निर्मिती करण्यासाठी, सामाजिक स्तरावर संवाद साधण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी एकत्र आणण्याचा मनसुबा आहे. हे युजर्सना भविष्यात स्क्रीन्सच्या मर्यादांपलीकडे आणि अंतरासंदर्भातील सीमांच्या पलीकडे जाण्यास सक्षम करेल, जेथे प्रत्येकजण नवीन शक्यतांची निर्मिती करण्यासाठी आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी एकत्र उपस्थित असू शकतात.
एमजी मोटर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, “मानवी इतिहासामध्ये इतर कोणत्याही नवोन्मेष्कारापेक्षा डिजिटल तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत झाले आहेत. एमजीव्हर्स हे एक पाऊल पुढे आहे, जेथे युजर्स वास्तविक जगाप्रमाणेच व्हिज्युअलाइज्ड डेटाशी संवाद साधू शकतात. एमजीमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना प्रत्येक टचपॉइंटवर सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. एमजीव्हर्स हा आमचा मेटाव्हर्स निर्माण करण्याप्रती दृष्टीकोन आहे, ज्यामध्ये आम्ही आणि आमचे भागीदार भविष्यात ग्राहकांचा अनुभव सातत्याने वाढवण्यासाठी सतत नवीन उपाय शोधू, त्यामध्ये नाविनन्यता आणू, सुधारणा करू आणि नवीन उपाय विकसित करू.”
ते पुढे म्हणाले, “हा उपक्रम आम्हाला जनरेशन झेड व जनरेशन अल्फासोबतचे आमचे संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल. एमजीव्हर्ससह आम्ही नवोन्मेष्कारी ब्रॅण्ड अनुभवांसह भावी पिढीशी ओळख करून घेण्यासाठी आमचे व्हर्च्युअल ग्राहक अनुभव कन्टेन्ट निर्माण करू.”
ग्राहकांना एमजीव्हर्समध्ये त्यांच्या सर्जनशीलतेचा शोध घेण्यासाठी ब्रॅण्ड पाच विभिन्न एक्स्परिअन्स सेंटर्सची सुविधा देईल:
एक्स्प्लोर अॅण्ड क्रिएटर्स सेंटर: हे युजरला मेटाव्हर्समध्ये त्यांच्या आवडत्या एमजी वेईकलचे वैयक्तिकरण, अॅक्सेसराइज व निर्माण करण्याची सुविधा देईल. हे सेंटर ग्राहकांना त्यांच्या आवडीची शहरे व रस्त्यांवर व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्ह घेण्याची सुविधा देईल. एमजीव्हर्स ग्राहकांना त्यांच्या घरांमधून आरामात त्यांच्या एमजी कार्स बुक करण्याची देखील सुविधा देईल.
एनएफटी गॅलरी: हे युजर्सना प्रदर्शनार्थ असलेले एमजीचे सर्वोत्तम कलेक्शन्स पाहण्याची सुविधा देईल आणि त्यांना व्यासपीठावर एनएफटींसह सहयोग, सहनिर्मिती, यादी व व्यवहार करण्यास सक्षम करेल. तसेच ते व्यक्ती व क्रिएटर्सना त्यांचे स्वत:चे एनएफटी तयार करण्याची व कमावण्याची संधी देखील देईल.
एमजी कार क्लब: एमजीसीसीच्या सदस्यांना मेम्बर्स-ओन्ली इव्हेण्ट्स व कॉन्सर्टसच्या माध्यमातून कनेक्ट, संलग्न होण्याची आणि एकत्र सेलिब्रेट करण्याची आणखी एक संधी मिळेल. त्यांना एमजीव्हर्समधून एमजी मर्चंडाइज खरेदी करण्याचा पर्याय देखील मिळेल.
गेमिंग एरिना: युजरला एमजीच्या संपन्न रेसिंग हिस्ट्रीचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. युजर्स स्पोर्टीअर एमजीमध्ये रेस करण्यासाठी त्यांचे आवडते रेसट्रॅक निवडू शकतात किंवा इतर गेम्स खेळू शकतात. म्हणून युजर एमजीव्हर्सवर अनेक गेम्स खेळण्याचा आनंद घेऊ शकतो.
एमजी नॉलेज सेंटर: हे आमचे कर्मचारी व भागीदारांना कौशल्य वाढवण्याची आणि व्हर्च्युअल प्रशिक्षण सत्रे, कॉन्फरन्सेस, मीटिंग्ज इत्यादींना उपस्थिती राहण्याची संधी देईल.
हे व्यासपीठ जनरेशन झेड व जनरेशन अल्फाला सामावून घेण्यासाठी मोबाइल, तसेच इतर वेब ब्राऊजर्सवर उपलब्ध असेल. एमजीचा व्हीआर (व्हर्च्युअल रिअॅलिटी) हेडसेट्ससाठी असेच अनुभव उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे घरी व डिलरशिप्समध्ये अधिक लक्षवेधक व वास्तववादी अनुभव मिळतील. हे व्यासपीठ टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केले जाईल, जेथे पहिला टप्पा आगामी सणासुदीच्या काळात राबवण्यात येणार आहे.