दैनिक स्थैर्य । दि. ११ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने जानेवारी २०२३ मध्ये त्यांच्या ग्राहक संख्येमध्ये वार्षिक ५४.५ टक्क्यांची प्रभावी वाढ केली, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांचीची संख्या जवळपास १२.८९ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामध्ये ग्राहक संपादन ०.३९ दशलक्ष होते.
कंपनीने उच्च स्तरावर वर्षाची सुरूवात केली, जेथे व्यवसाय घटकांमध्ये प्रबळ वाढीची नोंद केली. कंपनीचा एकूण इक्विटी उलाढाल मार्केट शेअर २१.९ टक्क्यांसह ७७ बीपीएसपर्यंत वाढला. सरासरी दैनिक उलाढाल वार्षिक १०८.९ टक्क्यांच्या वाढीसह १७.०२ ट्रिलियन रूपयांपर्यंत पोहोचली आणि ८६ दशलक्ष ऑर्डर्स बुक करण्यात आल्या, ज्यामध्ये वार्षिक २८..५ टक्क्यांची सर्वोच्च वाढ झाली. सरासरी ग्राहक फंडिंग बुक १३.९३ बिलियन रूपये राहिले.
एंजल वन लि. चे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, ‘‘मागील काही महिन्यांच्या तुनलेत आमच्या एकूण ग्राहक संपादनामध्ये लक्षणीय वाढ दिसण्यात आली आहे. प्रतिकूल स्थिती असताना देखील रिटेल गुंतवणूकदारवर्गामधील मासिक वाढीमधून भारतीय भांडवल बाजारपेठांची वाढती क्षमता दिसून येते, जे सकारात्मक चिन्ह आहे.’’
एंजल वन लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, ‘‘प्रबळ तंत्रज्ञान पायाभूत सुविधेने आमच्या वाढीला साह्य केले आहे. एंजल वन वापरकर्त्यांना सुलभ अनुभव देण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट करण्यामध्ये नेहमी अग्रस्थानी आहे. यंदा देखील आम्ही आमच्या व्यासपीठावर वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्याप्रती आणि न पोहोचलेल्या बाजारपेठांमध्ये पोहोचण्याप्रती आमचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.’’
तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगती करण्याच्या आपल्या योजनांशी बांधील राहत एंजल वनने त्यांचे सुपर अॅप लाँच केले, जे सुलभता, पारदर्शकता, उपलब्धता, खात्रीशीरता आणि चपळता या पाच प्रमुख आधारस्तंभांवर डिझाइन करण्यात आले आहे. हे अॅप सर्व वापरकर्त्यांसाठी आयओएस व वेब व्हर्जन्समध्ये आणि मर्यादित वापरकर्त्यांसाठी अँड्रॉईड व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.