दैनिक स्थैर्य । दि. ०१ जून २०२२ । फलटण । फलटण वकील संघाचे उपाध्यक्ष ॶॅड. सुनिल शिंदे आणि सरकारी वकील ॶॅड. कुणाल जाधव हे निस्पृह, निस्वार्थी वृत्तीने आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी घेत असलेली मेहनत प्रेरणादायी असून समाजातील गरजू लोकांसाठी ते आपल्या ज्ञानाचा उपयोग निश्चित करतील याची ग्वाही देत अरविंद मेहता यांनी या दोघा वकिलांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
फलटण न्यायालयात गेली काही वर्षे उत्तम वकिली व्यवसाय करणारे ॶॅड. कुणाल जाधव यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आणि फलटण वकील संघ उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ॶॅड. सुनिल शिंदे यांचा क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्यावतीने अरविंद मेहता यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला, अध्यक्षस्थानी माळी समाजाचे ज्येष्ठ नेते दशरथ फुले होते. कोळकी ग्रामपंचायत माजी सरपंच दत्तोपंत शिंदे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, नरसिंग शिंदे यांच्यासह वकील, डॉक्टर्स, विविध संस्थांचेपदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते.
ॶॅड. कुणाल जाधव यांनी सरकारी वकील म्हणून काम करताना पोलिस यंत्रणेला सहाय्य जरुर करावे, किंबहुना ती त्यांची जबाबदारीच आहे, मात्र गोरगरीबांना नाहक त्रास होत असेल तर जबाबदारी आणि सामाजिक बांधीलकी यांची सांगड घालून ते काम करतील याची ग्वाही देत अरविंद मेहता यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
समाजातील गरजू व्यक्ती किंवा कुटुंबाकडून एक रुपयाही वकील फी न घेता, प्रसंगी स्वतःच्या वाहनाने त्यांना जिल्हा न्यायालया पर्यंत नेऊन न्याय मिळवून देण्याचे काम स्व. ॶॅड. साहेबराव जाधव यांनी केले आहे, तीच परंपरा त्यांचे सुपुत्र ॶॅड. कुणाल जाधव चालवतील याची ग्वाही देत त्यांचे दुसरे सुपुत्र न्यायाधीश असून त्यांचे काम ही न्यायाशी बांधीलकी जपणारे असल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
स्व. ॶॅड. साहेबराव जाधव यांनी आपला व्यवसाय निस्पृह व निस्वार्थी भावनेने करताना राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करुन आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्याने त्यांच्या त्या प्रतिमेच्या माध्यमातूनही त्यांनी अनेकांची अडलेली कामे पूर्ण करुन त्यांना दिलासा देण्याचे काम केले असल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण वकील संघाच्या अध्यक्ष पदाची निवड अत्यंत चुरशीने व अटीतटीने होत असताना उपाध्यक्षपदी ॶॅड. सुनिल शिंदे यांची बिनविरोध झालेली निवड त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर शिक्का मोर्तब करणारी असल्याने ते आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील त्याचबरोबर समाजातील गरजूंना योग्य मदत निश्चित करतील याची ग्वाही देत अरविंद मेहता यांनी त्यांचेही अभिनंदन केले.
ज्या समाजाचे संघटन मजबुत असेल, त्यांच्यात एक वाक्यता असेल, एक नेता असेल तर त्यांच्या सर्व प्रश्नांची तड तो नेता लावून घेतो, मात्र नेता कोण यासाठी मतभेद झाल्यास संघटन खिळखिळे होऊ शकते त्यासाठी निस्वार्थी नेता असला पाहिजे अन्यथा सामुदायिक नेतृत्व निर्माण करुन समाज एकसंघ ठेवला पाहिजे तरच राजकारण व समाजकारणात समाजाला किंमत मिळत असल्याचे अरविंद मेहता यांनी स्पष्ट केले.
समाजात एकवाक्यता आणि खंबीर नेतृत्व असेल तर समाजाला कोणाकडे काही मागावे लागत नाही, राजकीय पक्ष, नेते स्वतःहुन त्या समाजाची दखल घेतात असे सांगून
आपले कुटुंब, व्यवसाय, याबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून कौटुंबिक जबाबदारीतून प्रत्येकाने काही वेळ सामाजिक संघटन, समाजाचे प्रश्न यासाठी वेळ दिला पाहिजे अशी अपेक्षा दत्तोपंत शिंदे यांनी व्यक्त केली.
विशेषत: समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्यांनी समाजातील दुर्बलांना मदतीचा हात देवून समाजाबरोबर राहण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, किमान त्यांच्या अडीअडचणीत त्यांना मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत माळी समाज संख्येने अधिक आणि सक्षम असूनही संघटीत नसल्याने राजकीय लाभ मिळत नसल्याचे कोळकी ग्रामपंचायत माजी सरपंच दत्तोपंत शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
संदीपकुमार जाधव यांनी समाज सुशिक्षीत झाला, सक्षम झाला परंतू संघटीत झाला नसल्याची खंत व्यक्त करीत त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज स्पष्टपणे नमूद केली.
ॶॅड. सुनिल शिंदे व ॶॅड. कुणाल जाधव यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन समाजातील गरजूंना मदत करण्याची ग्वाही दिली.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते क्रांतीसुर्य म. ज्योतीबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिलिंद नेवसे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविकात क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गरजूंसाठी सुरु असलेल्या कामाचा आढावा घेत कोरोना कालावधीत देशी परदेशी कंपन्यांशी संपर्क साधून वैद्यकिय साधने, औषधे गरजूंना तर उपलब्ध करुन दिलीच, त्याचबरोबर येथील उप जिल्हा रुग्णालयासाठी उपयुक्त ठरणारी सुमारे १५/१६ लाख रुपये किमतीची वैद्यकिय उपकरणे उपलब्ध करुन दिल्याचे निदर्शनास आणून दिले. दोन्ही सत्कार मूर्तींचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास ॶॅड. अविनाश अभंग, ॶॅड. बजरगं जाधव, ॶॅड. सुनील भोंगळे, ॶॅड. सुरज क्षीरसागर, ॶॅड. राहुल बोराटे, ॶॅड. चेतन नाळे, ॶॅड. हणमंत जाधव, ॶॅड. विशाल फरांदे, कृष्णात नेवसे, संदिप नाळे, मनोहर कुदळे, अनिल गायकवाड, शिवाजी भुजबळ, योगेश फुले आदी उपस्थित होते.
राजेश बोराटे यांनी सूत्र संचालन केले. दशरथ फुले यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.