उन्हाचा तडाख्यामुळे थंड पेयांना मागणी

स्टॉलधारकांचा शीतपेय विक्रीवर विशेष भर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 3 मार्च 2025 । सातारा ।
सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. दिवसभर उन्हाची काहिली व उकाड्याचे प्रमाण यामुळे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे शहरात जागोजागी थंडपेयाची मागणी वाढली आहे. यामुळे नागरिक आता शीतपेयाच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. परिणामी, स्टॉलधारकांनी शीतपेय विक्रीवर विशेष भर दिल्याचे शहरात दिसून येत आहे.

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी थंडपेयांची दुकाने थाटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी ऊसाच्या रस, लिंबू पाणी व कोकम सरबतला अधिक पसंती आहे. सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहेत. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक उपनगरात गाडीने प्रवास करतात. काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्टॉलवर मोसंबी, तसेच इतर फळांचा ज्यूस पिण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे दिसत आहे. तर बच्चेकंपनी कालाखट्टा, मिल्क शेक, कुल्पी तसेच बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसत आहे.

रसवंतीवर नागरिकांची गर्दी
शहरात ठिकठिकाणी रसवंतीची दुकाने सुरू झाली आहेत. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी ऊसाच्या रसाला पसंती दिली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर ऊसाच्या रसाची दुकाने थाटली आहेत. त्यात प्रामुख्याने राजवाडा बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, पोवईनाका, संगमनगर, विसावा पार्क, गोडोली, शाहूपुरी आदी परिसरात रसवंतीची दुकाने थाटली आहे. या रसवंतीगृहावर प्रवाशांची गर्दी होत आहे. फ्रीजमधील ऊसाच्या रसाला विशेष मागणी होत आहे.

विवाह समारंभात ताक, मठ्ठा
सध्या धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे व इतर कार्यक्रमांसाठी बाहेरगावी जाणार्‍यांनी उसाच्या रसाला पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे. तापमानामुळे विवाहसमारंभात ताक, मठ्ठा भोजनातील अविभाज्य घटक झाला आहे..


Back to top button
Don`t copy text!