आय एस एम टी च्या अमोल थोरात च्या प्रामाणिक पणाचे कौतुक


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । बारामती । बारामती एमआयडीसी मधील आय एस एम टी कंपनीचे कर्मचारी अमोल भानुदास थोरात यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक बारामती सहकारी बँकेने केले आहे. गुरुवार 9 जून रोजी अमोल थोरात बारामती बँकेच्या जळोची शाखेत ए टी एम मध्ये रक्कम काढण्यास गेले असता त्यांना ए टी एम च्या बाहेर दहा हजार रुपये आलेले आढळले त्यांनी त्वरित आय एस एम टी चे व्यवस्थापकीय संचालक किशोर भापकर यांना कल्पना दिली भापकर यांनी बँक प्रशासनाला याची माहिती दिली त्यानंतर मुख्य शाखेत थोरात यांनी चेअरमन सचिन सातव यांच्या कडे सदर रक्कम सुपूर्द केली.

या प्रामाणिक पणा बदल बॅंकचे चेअरमण सचिन सातव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सरव्यवस्थापक रवींद्र बनकर,बँक अधिकारी रणजित हाडके आदी उपस्तित होते.

क्षणिक मोह, अमिष यांना बळी न पडता प्राणिकपणा जीवनभर उपयोगी पडतो हाच यशस्वी जीवनाचा मंत्र असल्याचे सत्काराला उत्तर देताना अमोल थोरात यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!