आदर्श बहुजन शिक्षक संघाच्यावतीने लोकमाता अहिल्यादेवींना जयंती दिनी अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जून २०२२ । फलटण । आदर्श बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांचे ध्येय धोरणानुसार थोर विभुतींचे जयंतीचे कार्यक्रम सण म्हणून साजरे व्हावेत या अपेक्षा आहेत. त्यामुळे 31 मे राजमाता , पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर जयंती हा सण जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री. गणपत बनसोडे सर यांच्या निवासस्थानी (कोळकी) येथे आयोजित करण्यात आला होता.आदर्श बहुजन शिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य ) संघटनेचे जेष्ठ नेते लक्ष्मण गुंजवटे सर, मारूती ढगे सर, विश्वास अर्जुन सर, सुर्यकांत शिंदे सर, गजानन नाळे सर, राज्य उपाध्यक्ष राजेश बोराटे सर,जिल्हा अध्यक्ष गणपत बनसोडे सर,सौ.अनुराधा बनसोडे मॅडम, जिल्हा कार्याध्यक्ष बिपिन जगताप सर, तालुका अध्यक्ष जयवंत तांबे सर, तालुका सरचिटणीस राजेंद्र अहिवळे सर, आबासाहेब नाळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार आदर्श बहुजन शिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य ) सातारा जिल्हा अध्यक्ष गणपत बनसोडे सर यांनी केले.स्वागत राज्य उपाध्यक्ष राजेश बोराटे सर यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते लक्ष्मण गुंजवटे सर, प्रमुख पाहुणे फलटण तालुका सरचिटणीस राजेंद्र अहिवळे सर होते.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जिवनपट तालुका अध्यक्ष जयवंत तांबे सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले
तालुका सरचिटणीस राजेंद्र अहिवळे सर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास व जिवन प्रवास आपल्या भाषणात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण गुंजवटे सर यांनी संघटनेच्या ध्येय धोरणांचा व संघटना राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा कार्याची महती आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!