
दैनिक स्थैर्य । 9 मार्च 2025। सातारा । दोन दिवसांपूर्वी सातारा ते पुणे बसमध्ये प्रवाशाने सहप्रवासी तरुणीसमोर स्वतःशीच उघडपणे अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न केल्याचा प्रकार घडला होता. या विकृत तरुणास राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले.
याप्रकरणी राजगड पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून कमलेश प्रल्हाद शिरसाठ (वय 41 वर्षे सध्या रा. आंबेगाव खुर्द, पुणे मूळ रा. पी.एम.सी. बँकेसमोर, बदलापूर ईस्ट, जि. ठाणे) यास ताब्यात घेतले आहे.
बुधवार दि. 5 मार्च रोजी सातारा ते पुणे या बसमध्ये शिरवळ बस थांब्यावर एक अनोळखी पुरुष बसमध्ये चढून, फिर्यादी तरुणी बसमध्ये बसलेल्या सीटच्या उजव्या बाजूला असणार्या सीटवर बसला आणि फिर्यादीकडे बघून त्याने स्वतःशीच उघडपणे अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न करण्याचा प्रकार केला. त्या तरुणास राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.