अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२२ । सातारा । सतरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या माण तालुक्यातील एकावर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भातील अधिक माहिती अशी, 22 मार्च 2022 रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान, संबंधित युवती आपल्या घरामध्ये अभ्यास करत बसली होती. त्यावेळी संशयित मोबाईल अपडेट करण्याच्या नावाखाली वायफाय सुविधा असणाऱ्या खोलीमध्ये आला त्याने संबंधित युवतीस जबरदस्तीने धरून तिच्याशी झटापट केली आणि लैंगिक अत्याचार केला. या प्रकारांमध्ये संबंधित युवती गर्भवती राहिली असल्याने आरोपीच्या विरोधामध्ये दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संबंधित युवकाला अद्यापही ताब्यात घेण्यात आलेले नाही पोलीस उपनिरीक्षक डी. डी. तुपे अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!