
दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । सातारा । सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला. आदित्य रामचंद्र बैले वय २१, रा. गुरुवार पेठ, सातारा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरामध्ये पाहुण्याकडे ही संबंधित सोळा वर्षांची मुलगी आली होती. त्यावेळी आदित्य याने तिचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी मैत्री करून मोबाईलद्वारे पाठलाग केला. या प्रकारानंतर संबंधित पीडित मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आदित्य बैले याच्यावर सातारा शहर पोलिसांनी विनयभंगचा गुन्हा दाखल केला.