दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२४| फलटण |
अजित मल्टीस्टेट सोसायटी, शाखा साखरवाडी फलटण येथील कर्मचार्यांनी मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक करून आर्थिक घोटाळा केला असल्याने फलटण शहर व तालुक्यातील सुमारे २००० महिलांवर आत्मदहन करण्याची वेळ आली असल्याने याविरोधात सर्वांना एकत्र करून आवाज उठवणार असल्याची माहिती फलटण शहर भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी दिली.
याबाबत नुकतीच महिलांची बैठक प्राथमिक स्वरूपात संपन्न झाली. या बैठकीमध्ये सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता व्यापक स्वरूपाची बैठक अहिंसा मैदान, बारस्कर गल्ली, रंगाने महादेव मंदिराजवळ आयोजित केली असून या वित्तीय संस्थेमुळे ज्या ज्या महिलांची व बचतगटांची फसवणूक झाली आहे त्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे अनुप शहा यांनी आवाहन केले आहे.
हिना अक्रम शेख (९२८४२३८७०६), रुकसाना इब्राहिम शेख (९५६१८५५६९१), अंजना गोकुळ भोसले (८६००९१६२३६), पायल योगेश पालखी (९६२३१९१६२५), वर्षा किशोर चव्हाण (७०२८७१६४४३), आसमा असिफ इनामदार (९२८४६३१३६५), शशिकला भोसले (९२७०११३१५२), शीतल सूर्यवंशी (९९७५ ९७६७७), रविराज कोटी (७७९८२१४४२०), अक्रम उर्फ मुन्ना शेख (९९७०५६२६६१) वरील क्रमांकाशी संपर्क साधून ज्या महिलांवर व बचत गटांवर अन्याय झाला आहे त्यांनी या लढ्यामध्ये सहभाग घेऊन झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणार्यांना मदत करावी, असे आवाहन सौ. अक्रम शेख यांनी बैठकीमध्ये बोलताना केले. यापूर्वीसुद्धा मोर्चा महिलांनी काढला होता व स्थानिक राजकीय नेत्यांना मदतीचे आवाहन केले होते.
यावेळी बोलताना अनुप शहा म्हणाले की,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी फलटण शहर यांच्या वतीने तालुक्यातील व शहरातील महिलांना न्याय देण्यासाठी संपूर्ण ताकदीने लढा उभारणार आहे. फक्त महिलांनी यामध्ये कुठल्याही दडपणाला बळी न पडता उघडपणे समोर आले पाहिजे.