अजिंक्यतारा कारखान्याची सामाजिक बांधिलकी उल्लेखनीय : अमोल सातपुते

प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । सातारा । प्लास्टिकचा वाढता वापर हा मानवी जीवनासाठी धोकादायक आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरण आणि सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. केवळ कायदा करून प्लास्टिक मुक्ती होणार नाही तर, जनजागृतीसह स्वतःपासूनच प्लास्टिक बंदीला सुरुवात केली पाहिजे. अजिंक्यतारा साखर कारखान्याने प्लास्टिक बंदीसाठी विविध उपक्रम राबवले असून या कारखान्याने सामाजिक बांधिलकी जोपासत उल्लेखनीय काम केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते यांनी केले.

शेंद्रे ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी सातपुते बोलत होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अजिंक्यतारा साखर कारखान्याचा पर्यावरण विभाग आणि अजिंक्यतारा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्यांविरोधात हाती फलक घेऊन व घोषणा देत शेंद्रे फाटा झेंडा चौक येथील भाजी मंडई परिसरात जनजागृती फेरी काढली.
अजिंक्यतारा साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यांमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे मोहिते यांनी सांगितले. अजिंक्यतारा कारखाना पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच अग्रेसर असून प्लास्टिक बंदी जनजागृतीमध्येही सक्रिय सहभागी राहील असे ते म्हणाले.

अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रदूषण मंडळामार्फत तसेच कारखान्यामार्फत प्राथनिधीक स्वरूपात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

विद्यालयाचे शिक्षक ननावरे यांनी सूत्रसंचालन केले. अजिंक्यतारा कारखान्याचे सेक्रेटरी बशीर संदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रदूषण मंडळाचे फिल्ड ऑफिसर राहुल निंबाळकर, शेंद्रे गावचे सरपंच अस्लम मुलाणी, कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर सुरेश धायगुडे, डिस्टीलरी मॅनेजर दिनेश चव्हाण, लेबर ऑफिसर रणजित चव्हाण, पर्यावरण अधिकारी बी. डी. पोवार तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!