दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या 25 प्रभागाच्या अंतिम नकाशाला राजपत्रात प्रसिद्धी देण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा प्रकल्प संचालक तथा सातारा नगरपालिकेचे प्रशासन व मुख्याधिकारी अभिजित बापट गुरुवारी पुण्याला रवाना झाले . राजपत्रित प्रभाग रचनेचा नकाशा येत्या सोमवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता असून दरम्यान सातारा पालिकेने अंतिम प्रभाग रचनेचा नकाशा आपल्या दर्शनी भागांमध्ये प्रसिद्ध केला . या नकाशानुसार पंचवीस प्रभागासाठी तब्बल एक लाख 80 हजार 568 सातारकर यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यामुळे सातारा पालिकेच्या राजकीय घडामोडींना साधारण गणपती विसर्जनानंतर येण्याची चिन्हे आहेत.
प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता आरक्षण सोडतीची उत्सुकता भावी मेहरबानांना लागून राहिली आहे . अंतिम प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे या प्रभाग रचनेच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा गुरुवारी पुण्याला रवाना झाली . या प्रभाग रचनेचा नकाशा सातारा पालिकेच्या निवडणूक शाखेने पालिकेच्या दर्शनी भागांमध्ये प्रसिद्ध केला आहे . यंदा शहराच्या हद्दवाढीला मुळे एकूण 25 प्रभाग आणि पन्नास उमेदवार असे चित्र असून या प्रभागांसाठी 1 लाख 80 हजार 568 मतदार मतदान करणार आहेत यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 21800 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2057 इतकी आहे 50 टक्के आरक्षणानुसार 25 महिला व 25 पुरुष यंदा सातारकरांना निवडून द्यावयाचे आहेत.यामध्ये अनुसूचित जातीचे 6 व अनुसूचित जमातीचा एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे हद्द वाढीमुळे अनुसूचित जमातीचा नगरसेवक पहिल्यांदाच सातारा पालिकेच्या इतिहासात निवडला जाणार आहे , यंदाचे वैशिष्ट्य मानावे लागेल .
सातारा शहराची हद्दवाढ होताना ही झेड पद्धतीने दक्षिण-पूर्व दिशेने म्हणजेच तामजाई नगर, नंदनवन सोसायटी पिलेश्वरी नगर येथून सुरुवात करून दक्षिणेकडे पंचविसावा प्रभाग कात्रे वाडा येथे संपवण्यात आली आहे . प्रभाग रचना करताना शक्यतो नैसर्गिक हद्दी गृहीत धरून एल शेप किंवा पसरट चौरस पद्धतीने वार्डची रचना करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 3,4,5 प्रभाग क्रमांक 23 मध्ये हद्दवाढीचा बराचसा भाग समाविष्ट होत असून येथून निवडून येणाऱ्या उमेदवारां विषयी प्रचंड उत्सुकता आहे.
प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा येत्या सोमवारी राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे आता आरक्षण सोडत कशी असणार अनुसूचित जाती जमातीच्या सहा जागा असल्यामुळे सहा प्रभाग आरक्षित होणार हे उघड आहे आणि 44 जागांसाठी स्त्री आणि पुरुष निवडताना राजकीय मेरीट पाहूनच आमदार-खासदारांच्या आघाड्यांना निर्णय घ्यावे लागणार आहेत मात्र आरक्षण सोडतीमध्ये कोणाचा पत्ता वधारणार कोणाचा पत्ता कट होणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे . येत्या 20 जून पर्यंत किंमत त्यानंतर आरक्षण सोडतीचा दिनांक जाहीर होईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने एक जुलैपासून जनसंपर्क मोहिमेचे शहरात आयोजन केल्याची माहिती आहे अद्याप अधिकृत सूत्रांनी त्याला दुजोरा दिलेला नाही नगर विकास आघाडीने अद्याप आपले प्रचाराचे पत्ते ओपन केले नसून भाजपने मात्र मंडल प्रमुखांना मतदार याद्या गोळा करायच्या सूचना दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे राष्ट्रवादीने मात्र विधान परिषदेच्या घडामोडी नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले आहे.