महाराष्ट्र शासनाचा सातारा जिल्ह्यातील पहिला ‘कृषी सेवारत्न पुरस्कार’ सचिन जाधव यांना जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
सातारा जिल्ह्यातील पहिला महाराष्ट्र शासनाचा ‘कृषी सेवारत्न पुरस्कार’ सचिन जाधव यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासन, कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने कृषी, कृषि संलग्न क्षेत्र तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

सचिन जाधव हे सध्या सासकल (ता. फलटण, जि. सातारा) या गावी कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. सचिन जाधव यांनी सासकलसह ज्या ज्या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये सेवा केली, त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

सचिन जाधव यांना उत्कृष्ट कार्यासाठी यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल फलटण कृषी विभाग, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव मुळीक, उपाध्यक्ष विनायक मदने, बी. डी. घोरपडे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हणमंत गंगाराम मुळीक, लक्ष्मी आडके, सोनाली मंगेश मदने, सोपान रामचंद्र मुळीक, लक्ष्मण गणपत मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक, उज्ज्वला किरण घोरपडे, विभूती मोहन मुळीक व फलटण तालुक्यातील तमाम शेतकर्‍यांच्या वतीने व कुटुंबीय व मित्रमंडळींच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!