दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सांगवी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ‘स्वच्छ दूध उत्पादन’ या विषयावर श्री. अर्जुन मोरे यांच्या गोठ्यावर प्रात्यक्षिक करून माहिती दिली.
या प्रात्यक्षिकात दूध काढण्याच्या विविध पद्धती, जसे की पूर्णहात पद्धत, क्नकलिंग पद्धत व स्ट्रीपिंग पद्धत प्रात्यक्षिकातून दाखविल्या. यामधील सर्वात चांगली पद्धत म्हणजे पूर्ण हात पद्धतीची माहिती सांगितली व तिचे फायदे पटवून दिले. यासोबतच मशीन पद्धतीची देखील माहिती दिली.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर व प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
कृषीकन्या अंकिता कुंभारकर, अनुजा भिसे, तनुजा शिंगाडे, ऋतुजा भामे, प्रणिता आगवणे, पूजा चौधर यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.