
आपल्या प्रियजनांना संकटकाळात दिलासा आणि सुरक्षितता हे आपलं सर्वोच्च प्राधान्य असतं. प्रियजनांचे सर्वोत्तम आरोग्य कल्याण साधण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा होय. या सर्वसमावेशक प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला पर्याप्त वैद्यकीय खर्चाची उपलब्धता आणि वैयक्तिक पॉलिसींसाठी किंमत- किफायतशीर पर्याय उपलब्ध होतो. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या एकाच पॉलिसीच्या अंतर्गत निश्चित विमा रकमेसह सह विस्तृत संरक्षण प्रदान केले जाते. तुमचे पती / पत्नी, मुले, पालक यांच्या सोबतच सासू-सासरे किंवा अवलंबित भावंडे या विस्तारित कुटूंब सदस्यांचा देखील पॉलिसीत अंतर्भाव होतो. फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा द्वारे तुम्ही केवळ पॉलिसीत गुंतवणूक करीत नाही. तुम्हाला काळजी असणार्यांविषयी मन:शांतीची देखील सुनिश्चिती करतात.
फॅमिली फ्लोटर प्लॅन्स मध्ये विविध लाभांचा समावेश होतो. सर्वसमावेशक कव्हरेज साठी निश्चितच परिपूर्ण निवड ठरते. जाणून घेऊया प्रमुख लाभ-:
1. नवीन कौटुंबिक सदस्याचा समावेश: फॅमिली फ्लोटर पॉलिसी मध्ये स्वतंत्र पॉलिसी शिवाय नवीन सदस्यास जसे की, नवजात किंवा अवलंबित व्यक्तीस समावेशित करू शकतात. उदाहरणार्थ, जर चार सदस्यीय कुटुंबात बाळाचे आगमन झाल्यास, ते सध्याच्या प्लॅन मध्ये बाळाचा समावेश करू शकतील. हा दृष्टीकोन वैयक्तिक पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा अधिक किफायतशीर आहे. ज्यामुळे नवीन सदस्यासाठी त्वरित कव्हरेजची सुनिश्चितता प्राप्त होते. यामुळे प्रक्रियेचे सुलभीकरण होते. पैसे वाचतात आणि विस्तारणार्या कुटुंबासाठी व्यावहारिक मार्ग उपलब्ध होत असल्यामुळे त्रास टळतो.
2. परवडणारा हफ्ता: एका पॉलिसीअंतर्गत तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कव्हर केले जाते. त्यामुळे स्वतंत्र वैयक्तिक प्लॅन्सच्या तुलनेत सामान्यपणे कमी हफ्ता देय करावा लागतो. उदाहरणार्थ, चार सदस्यीय कुटुंबांना चार स्वतंत्र पॉलिसींच्या तुलनेत एकाच फ्लोटर पॉलिसी साठी तुलनेने कमी रक्कम भरावी लागते. हा किफायतशीर पर्याय सर्व प्रियजनांना आर्थिक तणावाशिवाय संरक्षित असल्याची खात्री देतो. ज्यामुळे सर्वसमावेशक संरक्षण कव्हरेज व्यवस्थापित करण्यासोबतच आरोग्य विमा व्यवस्थापित करण्याचा कार्यक्षम मार्ग बनतो.
3. कॅशलेस उपचार: बहुतांश पॉलिसी प्रदाते हे रुग्णालय साखळी (हॉस्पिटल नेटवर्क) सोबत संलग्नित आहेत. ज्यामुळे पॉलिसीधारकांना थेट कॅशलेस उपचार उपलब्ध होतात. पॉलिसी प्रदात्याद्वारे थेट वैद्यकीय बिलांची पूर्तता करण्याची काळजी घेतली जाते. वाढत्या प्रकरणांचा विचार करता, काही प्रदाते हे रुग्णालय साखळी सोबत संलग्नित नसलेल्या रुग्णालयात देखील कॅशलेस क्लेमची उपलब्धता करीत आहेत. ज्यामुळे लाभांची श्रेणी अधिक विस्तारते. अग्रीम करावयाच्या खर्चाची चिंता मिटते. आर्थिक तणाव कमी होतो आणि वेळेवर काळजी घेणं शक्य ठरतं. ज्यामुळे कुटुंबासाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनतात.
4. कर लाभ: भारतात 1961 च्या आयकर कायद्याच्या कलम 80ऊ अंतर्गत, फॅमिली फ्लोटर आरोग्य विम्यासाठी भरलेला हफ्ता कर कपातीसाठी पात्र आहेत. तुम्ही स्वत:चे, तुमचे पती/पत्नी आणि तुमच्या मुलांच्या कव्हरेज साठी 25,000 पर्यंत क्लेम करू शकता. जर तुम्ही तुमच्या पालकांना विमाकृत केले असल्यास 25,000 पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिक असल्यास तर 50,000 पर्यंत अतिरिक्त कपात लागू होते. कर बचत हा अमूल्य लाभ असला तरीही, आरोग्य विम्याची निवड ही कर लाभ डोळ्यांसमोर ठेऊन न करता वैद्यकीय संरक्षण हेतूनेच करावी. अशा दुहेरी लाभांमुळे आरोग्य सुरक्षा आणि वित्तीय नियोजन दोन्ही साध्य करणं सहजशक्य ठरतं.
5. आवश्यकतानुरुप (कस्टमाईज्ड) कव्हरेज: तुमच्या कुटुंबाच्या गरजांनुसार ड-ऑन्ससह फॅमिली फ्लोटर पॉलिसी तयार केल्या जाऊ शकतात. पर्यायांमध्ये प्रसूती खर्चासाठी मॅटर्निटी कव्हरेज, किरकोळ शस्त्रक्रियेसाठी दैनंदिन-उपचार प्रक्रिया किंवा पूर्व-विद्यमान स्थितींसाठी संरक्षण यांचा समावेश होतो. तुम्ही क्रिटिकल इलनेस कव्हर, डेंटल केअर किंवा आऊटपेशंट कन्सल्टेशन्स देखील समावेशित करू शकता. हे आवश्यकतानुरुप समावेशामुळे सर्वसमावेशक संरक्षणाची सुनिश्चितता मिळते. विविध आरोग्य गरजा पूर्ण करता येतात आणि मनःशांती प्राप्त होते.
फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा हा तुमच्या प्रियजनांच्या आरोग्य कल्याणाची सुनिश्चित करण्यासाठी एक व्यावहारिक, किफायतशीर मार्ग आहे. एकाधिक सदस्यांना कव्हर करणारी एकल पॉलिसी सुविधा ही खर्चात बचत आणि मजबूत संरक्षण प्रदान करते. नवीन कौटुंबिक सदस्याचा समावेश, कॅशलेस उपचार ते कर लाभांचा आनंद प्राप्त करण्याद्वारे हा प्लॅन भविष्यासाठी तुमच्या कुटुंबाच्या आरोग्य गरजा सुरक्षित करतो. आर्थिक सुरक्षा आणि मनःशांती दोन्ही मिळविण्यासाठी तुमच्या आवश्यकतेनुसार पॉलिसीची निवड करा.
भास्कर नेरुरकर – हेड – हेल्थ डमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स