दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । पुणे । अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ पिंपरी चिंचवड शाखा आयोजित *पाऊस कवितांचा* ही काव्य मैफिल वक्रतुंड सभागृह चिचवड येथे आज रंगली. या कार्यक्रमाचे उदघाटन लेखक कवी मा. विनायकराव जाधव महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य म.सा.मं. यांनी आपली सामाजिक विषयावरील कविता सादरीकरण करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सिध्दार्थ कुलकर्णी विदर्भ शाखा अध्यक्ष यांनी त्यांच्या चंदेरी दुनियेतील विविध क्षेत्रातील दीर्घ अनुभव कथन व फेस बुकचं फसव्या जगात जगण्या पेक्षा प्रत्यक्ष मैत्री करा अशा आशयावरील कविता सादर करत मोलाचा संदेश दिला. वय वर्षे २० ते ८० वर्षे वयोगटातील कवींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास ४० कवींनी सुंदर रचनांच्या सादरीकरणाने सहभाग नोंदवला. संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आटोपशीर आयोजन सौ.जयश्री श्रीखंडे अध्यक्षा पिं.चि शाखा यांनी केले
डाॅ. नीता बोडके अध्यक्षा हवेली तालुका यांनी सह आयोजका म्हणून सहकार्य केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन सौ मानसी चिटणीस यांनी केले..संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात श्री जयंत श्रीखंडे यांचे मोलाचं सहकार्य लाभले. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ जयप्रकाश घुमटकर सरांनी केलेलं मार्गदर्शन व हार्दिक शुभेच्छां मुळे कार्यक्रम सुंदर रीतीने पार पडला.